हडपसरमध्ये डॉक्टरांच्या संघटनांचा मोर्चा
हडपसर, ता. १६ : हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या विविध संघटनांनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवून एकत्र येत परिसरातून मूक मोर्चा काढला. लोहिया उद्यान येथून हडपसर पोलिस ठाणे आणि पुढे सह्याद्री रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
सह्याद्री रूग्णालयात केरू सपकाळ (वय ७७) या रुग्णाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध वैद्यकीय संघटनांनी सहभागी होत मूक मोर्चा काढला.
हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज कुंभार, डॉ. राजेश खुडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. राहुल झांजुर्णे, ‘जीपीए’चे अध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटीचे डॉ. संपत डुंबरे, पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे डॉ. सचिन आबने, डॉ. संजय पाटील, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस्चे अध्यक्ष डॉ. एच. के. साळे यांच्यासह सह्याद्री रूग्णालय आणि हडपसर परिसरातील वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
‘कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, काही नातेवाईक किंवा कार्यकर्ते गैरसमज करून वैद्यकीय आस्थापनांवर हल्ला करतात. त्यामुळे रुग्णसेवा देताना मोठा अडथळा निर्माण होत आहे,’’ अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली.
सह्याद्रीवरील हल्ल्यातील आरोपींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस आयुक्तांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

