महाराजस्व समाधान शिबिराचा वडगावातील ३८० जणांना लाभ

महाराजस्व समाधान शिबिराचा वडगावातील ३८० जणांना लाभ
Published on

वडगाव निंबाळकर, ता. ९ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल महाराजस्व समाधान
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या १५ गावांतील नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला. त्यातील ३८० नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून लाभ मिळाला.

उद्‌घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, आशादेवी वायाळ, महसूल नायब तहसीलदार श्रीमती गायकवाड, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस पाटील, सरपंच, प्रशासक तसेच मंडल अधिकारी उपस्थित होते. सरपंच सुनील ढोले यांनी स्वागत तर मंडल अधिकारी गजानन पारवे यांनी प्रास्ताविक केले.
महसूल विभागामार्फत उत्पन्न, अधिवास, नॉन क्रिमी लेयर, अल्पभूधारक दाखले आदी ५० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत मोहिमेत ४८ लाभार्थ्यांची कामे करण्यात आली. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत १४८ शेतकऱ्यांना अद्ययावत सातबारा व ८-अ उतारे देण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत ५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाने ४५ लाभार्थ्यांना औषधी वाटप केले. कृषी विभागामार्फत एका लाभार्थ्यास ट्रॅक्टरचे वाटप केले. ग्रामपंचायत विभागाने जन्म-मृत्यू दाखले व घराचे उतारे उपलब्ध करून दिले.

03080

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com