कांदा, वांगी, शेवग्याच्या भावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा, वांगी, शेवग्याच्या भावात घट
कांदा, वांगी, शेवग्याच्या भावात घट

कांदा, वांगी, शेवग्याच्या भावात घट

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १९ : बाजारात आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक घटली होती. त्यातच मागणीही कमी असल्याने कांदा, वांगी आणि शेवग्याच्या भावात घट झाली असून टोमॅटोच्या भावात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. १९) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून सुमारे ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश आाणि तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ७ ते ८ ट्रक गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेशातून तोतापूरी कैरी २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून २० ते २२ ट्रक मटार, बंगळूर येथून १ टेम्पो आले, मध्य प्रदेश आाणि गुजरातमधून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ११०० ते १२०० पोती, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, कांदा
७० ते ७५ ट्रक, इंदूर आणि स्थानिक भागातून बटाटा ३० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ८०-१००, बटाटा : १००-१४०, लसूण : २००-६००, आले सातारी : २००-४५०, आले बंगळूर : ४००, भेंडी : ४००- ५००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १००-१६०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २५०-४००, काकडी २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१८०- २००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-१२०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००-३५०, शेवगा : ६००-८००, गाजर : १६०-२००, बीट : ६०-७०,घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३०० -३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य: २२०-२६०, पावटा : ३००- ४००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०- १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कांदापात, करडई महागले
पुणे मार्केट यार्डात रविवारी कांदापात, करडई आणि मुळा यांच्या भावात वाढ झाली असून चाकवत अंबाडी आणि पालकच्या भावात घट झाली आहे तर कोथींबीर,
मेथी, शेपू, पुदीना, राजगिरा, चुका आणि चवळीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची १ लाख २५ हजार गड्डीची आवक झाली. तर मेथीची ५० हजार गड्डीची आवक झाली असून घाऊक बाजारात कांदापात, करडई आणि मुळे यांच्या भावात गड्डीमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे तर पालकच्या भावात गड्डीमागे दोन रुपयांनी तर चाकवत आणि अंबाडीच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : ६००-१०००, मेथी : ४००-७००, शेपू : ३००-६००, कांदापात : ४००-८००, चाकवत : ३००-५००, करडई : ४००- ६००, पुदीना : २००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ४००-८००, राजगिरा : ३००-६००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-५००, पालक : ३००-८००.

फळबाजार
बाजारात कलिंगड, खरबूजाच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सोलापूरच्या बोरांचा हंगाम संपल्याने त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. मागणी अभावी पपईच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून आहेत. रविवारी (ता. १९) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री ३० टन, मोसंबी ४० ते ५० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार ते दोन हजार गोणी, पेरू ३०० ते ४०० क्रेटस, कलिंगड ३० ते ४० गाड्या, खरबुज २० ते २५ गाड्या, बोरे २ ते ३ पोती इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे -
लिंबे (प्रति गोणी) : ४००-१२००, अननस : १००-५००, मोसंबी : (३ डझन) : २००-४००, (४ डझन) : ४०-१६०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-२००, गणेश : १०-४०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, पेरू (२० किलो) : ४००-५००, चिक्कू (१० किलो) : १००-५५०, बोरे (१० किलो) : चेकनट : १०००-१२००, चण्यामण्या : ७००-८००. द्राक्षे (१० किलो) सुपर सोनाका ५००-६००, सोनाका ४५०-५५०, माणिकचमन ३००-४५०, जम्बो ५००-८००, शरद ४५०-६००.

फुलबाजार
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर झेंडू, अस्टरसह शोभिवंत फुलांना चांगली मागणी राहिली. त्यानंतर, रविवारी बाजारात सर्व फुलांची आवक साधारण राहिली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने रविवारी सर्व फुलांच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : २०-५०, गुलछडी : १५०-२५०, अष्टर : जुडी १०-१६, सुट्टा ५०-१२०, कापरी : २०-५०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : २०-५०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ७०-१००, जिप्सोफिला : ३००-५००, मोगरा : ८००-१०००.