हिरवी मिरची, लसूण, शेवग्याच्या भावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरवी मिरची, लसूण, शेवग्याच्या भावात वाढ
हिरवी मिरची, लसूण, शेवग्याच्या भावात वाढ

हिरवी मिरची, लसूण, शेवग्याच्या भावात वाढ

sakal_logo
By

मंडई
मार्केट यार्ड, ता. ४ : रविवारी (ता. ४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळे आणि भाजीपाल्यांची आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. मात्र हिरवी मिरची, सिमला मिरची, लसूण, शेवगा आणि घेवडा यांच्या दरांत वाढ झाली आहे.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून ५ टेम्पो मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून सुमारे १२ टेम्पो लसणाची आवक झाली.
तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० गोणी, गवार भेंडी, कोबी, गाजर आणि हिरवी मिरची प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ११ हजार क्रेट्स, काकडी, सिमला मिरची, तांबडा भोपळा आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे २०० गोणी, गावरान कैरी ३ टेम्पो, कांदा सुमारे ७५ ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली आहे.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ६०-१२०, बटाटा : ११०-२००. लसूण : ५००-१०००, आले : १३००-१३८०, भेंडी : १५०- ३५०, गवार : गावरान व सुरती २००-४००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ५००-६००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-४००, बीट : १४०-१५०, घेवडा : १०००-१४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००- २५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ३५०-४५०, मटार : परराज्य: ६००-६५०, पावटा : ५००- ६००, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - २००-३००, कैरी गावरान : १००-२००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबिरीची १ लाख तर मेथीच्या ५० हजार जुड्या दाखल
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : १०००-१८००, शेपू : ४००-८००, कांदापात : ५००-१२००, चाकवत : ४००-८००, करडई : ३००- ७००, पुदीना : २००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१६००.

सर्व प्रकारच्या फुलांना मागणी
बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक साधारण असून त्यांना मागणीही टिकून असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे - झेंडू : २०-५०, गुलछडी : ६०-१५०, अ‍ॅष्टर : जुडी २०-४०, सुट्टा १००-१५०, कापरी : ३०-६०, शेवंती : १००-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती काडी १५०-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : ५०-१५०, मोगरा : २००-४००.

फळबाजार
बाजारात डाळिंब, चिक्कू, पेरू आदी फळांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, कलिंगड व खरबुजाच्या भावात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली असून मागणीअभावी पपईचे भाव उतरले आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या लिंबांच्या तुलनेत मागणी वाढल्याने १५ किलोंच्या गोणीमागे भाव शंभर रुपयांनी वधारले आहेत. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून आहेत. फळबाजारात केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई २० ते २२
टेम्पो, लिंबांची सुमारे एक ते बाराशे हजार गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज १० ते १५ टेम्पो, पेरू ३०० ते ४०० क्रेट्स, चिक्कू एक हजार डाग, गावरान आंबा ५ ते ६ टन, हापूस आंबा एक हजार पेटी, कर्नाटक आंब्याची दोन हजार पेटी व बॉक्सची आवक झाली.