बाजारात मागणी अभावी 
फुलांचे भाव उतरले

बाजारात मागणी अभावी फुलांचे भाव उतरले

Published on

मार्केट यार्ड, ता. १८ : सण, उत्सव नसल्याने सध्या फुलांना मागणी कमी झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत फुलांना मागणी कमी असल्याने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फुलबाजारात रविवारी (ता. १८) फुलांना आवक घडली आहे. परिणामी फुलांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी उतरले आहेत. मागील आठवड्यात झेंडू ५० ते ८० रुपये किलो होता. तोच या आठवड्यात ३० ते ७० रुपयांच्यावर आला आहे. त्यामु‌ळे बाजारात फुलांना मागणी अभावी भावही घसरले असल्याची माहिती फुल बाजार प्रमुख एस. कोंडे यांनी दिली़.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : ३० ते ७०, गुलछडी : ४० ते ६०, अष्टर : जुडी २० ते ४० , सुट्टा ६० ते १५०, कापरी : ४० ते ७०, शेवंती : ६० ते १४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५ ते २५, गुलछडी काडी : ४० ते ५० , डच गुलाब (२० नग) : ६० ते १२०, जर्बेरा : १० ते ३०, कार्नेशियन : ७० ते ८०, शेवंती काडी ११० ते १२०, लिलियम (१० काड्या) ६०० ते ८००, ऑर्चिड ३०० ते ३५०, ग्लडिओ (१० काड्या) : ७० ते १००, जिप्सोफिला : ८० ते १००, मोगरा : १०० ते २००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.