मागणी कायम असल्याने
चिकन, मटणाचे भाव टिकून

मागणी कायम असल्याने चिकन, मटणाचे भाव टिकून

मार्केट यार्ड, ता. १२ : खोल समुद्रातील मासळीसह अन्य मासळींचे गत आठवड्यातील तेजीतील भाव कायम आहे. मागणी व पुरवठा कायम असल्याने चिकन व मटणाचे गत आठवड्यातील भाव टिकून आहेत. आवक रोडावल्याने गावराने अंडी शेकड्यामागे ५० तर इंग्लिश अंडी शेकड्यामागे ९५ रुपयांनी वधारल्याचे सांगण्यात आले.
रविवारी (ता. १२) बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) ः
पापलेट : कापरी : १७००-१८००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १३००-१४००, लहान : १०००-११००, भिला : ७००-८००, हलवा : ८००-९००, सुरमई : १०००-१२००, रावस : ८००-९००, घोळ : ७००-८००, करली : ३६०-४००, करंदी (सोललेली) : ४४०-४८०, भिंग : ३६०-४००, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ७५०-८००, काळी : ४००-४५०, ओले बोंबील : १८०-२२०. कोळंबी : लहान २००-२४०, मोठी : ३६०-५५०, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १८००-१९००, मोरी : ३२०-३६०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २८०-३२०, चिंबोऱ्या : ६००-६५०.

खाडीची मासळी :
सौंदाळे : २००-२४०, खापी : २००-२४०, नगली : ३६०-४००, तांबोशी : ५००-५५०, लेपा : २००-२४०, बांगडा : १८०-२००, शेवटे : २००-२४०, पेडवी : १२०-१४०, बेळुंजी : १६०-१८०, खुबे : १२०-१६०, तिसऱ्या : २००, तारली : १६०-१८०.

नदीतील मासळी :
रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ : २८०-३२०, शिवडा : १४०-१६०, खवली : २००-२२०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : ३००-३५०, चिलापी : ६०-८०, वाम : ४८०.
मटण :
बोकड : ७४०, बोलाई : ७४०, खिमा : ७४०, कलेजी : ७८०, चिकन : २६०, लेगपीस : ३२०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३५०.
अंडी :
गावरान (शेकडा) ८९०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ५९०, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com