मुसळधार पावसाने मार्केट यार्ड जलमय

मुसळधार पावसाने मार्केट यार्ड जलमय

Published on

मार्केट यार्ड, ता. १६ : पुण्यात मंगळवारी दुपारनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने गुलटेकडी येथील मार्केट यार्ड अक्षरशः जलमय झाले. पुण्यातील सर्वात मोठी भाजी व फळांची बाजारपेठ असलेल्या या ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. सगळीकडे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
ट्रक व वाहनांतून उतरवलेला भाजीपाला पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कांदा, टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरचीसह द्राक्षे, पेरू, डाळिंब यांसारखी हंगामी फळे पाण्यात भिजून खराब झाली. अनेक ठिकाणी चिखल आणि गाळ साचला होता. विक्रीसाठी आणलेला माल खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, व्यापाऱ्यांनाही लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.
बाजार समितीकडे वारंवार पाणी निचरा आणि कचऱ्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि मार्केट यार्ड परिसरात कायमस्वरूपी जलनिस्सारणाची सुविधा उभारावी, अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
--------
पावसामुळे मार्केट यार्ड परिसर चिखलमय होतो. त्यातच शेतमाल विकणे बरोबर वाटत नाही, तसेच अनेकदा शेतमाल साफ करून विकावा लागतो. त्यामुळे बाजार समितीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन
----------
मार्केट यार्ड : पावसामुळे परिसर जलमय झाल्याने फळे, भाजीपाला वाहून जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com