दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फूल बाजार बहरला

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फूल बाजार बहरला

Published on

मार्केट यार्ड, ता. ३० : साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या स्वागताला झेंडूची मोठी मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फूल बाजारात मंगळवारी झेंडूची तब्बल १८० ते २०० टन आवक झाली, तर पावसामुळे ओल्या झेंडूला दर्जानुसार ३० ते ४० रुपये, तर चांगल्या प्रतीच्या झेंडूला १०० ते १२० रुपये भाव मिळाला. शेवंती, ॲस्टर, गुलछडी, जरबेरा, गुलाब यासह इतर फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती. बुधवारी (१ सप्टेंबर) झेंडूची आवक आणखी वाढणार आहे.

पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला. घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून फुलांची खरेदी बुधवारी केली जाणार आहे. यंदा झेंडूचे दर तेजीत राहणार असून, सुक्या झेंडूला चांगले दर मिळणार आहेत. मार्केट यार्डातील फूल बाजारात मंगळवारपासून झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली. पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड, हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीस पाठविला.


पुणे शहर, उपनगरांतील ग्राहक, तसेच किरकोळ बाजारातील फूल विक्रेत्यांची बुधवारी खरेदीसाठी गर्दी होईल. झेंडूची बुधवारी आवक आणखी वाढेल. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत फुलांना उच्चांकी मागणी असते. दसऱ्याला झेंडूला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी झेंडूची फुले राखून ठेवतात. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूचे दर १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याची माहिती मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
--------
यंदा पावसामुळे झेंडूचे मोठे नुकसान झाले. दसऱ्याला झेंडूला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी झेंडू राखून ठेवतात. दसऱ्यापूर्वी झेंडूची तोड करून विक्रीस पाठविला जातो. गुरुवारपर्यंत फुलबाजाराचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. बुधवारी झेंडूची आवक आणखी वाढेल.
- अरुण वीर, अध्यक्ष, फूल बाजार अडते असोसिएशन
---
घाऊक बाजारातील फुलांचे दर
झेंडू (सुका) - १०० ते १२० रुपये
झेंडू (ओला) - ३० ते ४० रुपये
गुलछडी - ५०० ते ७०० रुपये
शेवंती - १०० ते २५० रुपये
------
बासुंदी, श्रीखंडला मागणी
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात बासुंदी, आम्रखंड आणि श्रीखंडला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. शहरात फुलांच्या खरेदीसमवेत अनेकांनी श्रीखंड, आम्रखंड आणि बासुंदी खरेदी केली. त्यामुळे दररोजच्या मागणीपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी त्याची मागणी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com