शेतकऱ्यांच्या नशिबात होता लाल चिखल, पण नारायणगावात झाले मालेमाल

tomato
tomato

नारायणगाव (पुणे) : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात जून व जुलै महिन्यात १५ लाख ९८ हजार ९९० टोमॅटो क्रेटची आवक झाली. टोमॅटो खरेदी विक्रीतून दोन महिन्यात ५१ कोटी ६१ लाख ७३ हजार रुपयांची उलाढाल झाली. टोमॅटो क्रेटला (20 किलो) सरासरी ३२२ रुपये भाव मिळाला. लॉकडाउन व कोरोनाची पार्श्वभूमी असताना नियमांचे पालन करून टोमॅटो उपबजार सुरू ठेवल्यामुळे पुणे, नगर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी उपबजारात टोमॅटो खरेदी विक्रीतून सुमारे १२५ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यानंतर टोमॅटोसह इतर भाजीपाला शेतात खराब झाला. त्यानंतर झालेले चक्रीवादळ व गारपीट या मुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाउन व मार्च ते मेदरम्यान बाजार समिती बंद ठेवण्यात आली. त्यामुळे परप्रांतीय व्यापारी व कामगार निघून गेले. वाहतूक बंद असल्याने शेतमालाची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे टोमॅटो व भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जून महिन्यात जुन्नर बाजार समितीने भाजीपाला खरेदी विक्रीचे लिलाव सुरू केले. कोरोनाच्या पार्श्वभूमी असताना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जोखीम स्वीकारून कर्तव्य बजावले. त्यामुळे जूननंतर टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाले. व्यापारी दाखल झाल्याने जून व जुलै महिन्यात टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार शंभर रुपये ते सहाशे रुपयांदरम्यान भाव मिळाला. सध्या येथील टोमॅटो उपबजारात जुन्नर, आंबेगावसह बीड, उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातील टोमॅटो विक्रीसाठी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमी टोमॅटो उपबजारा सुरु ठेवल्याने मागील दोन महिन्यात टोमॅटो खरेदी विक्रीतुन दोन महिन्यात ५१ कोटी ६१ लाख ७३ हजार रुपयांची उलाढाल झाली, असे काळे यांनी सांगितले. 

सभापती काळे व जेष्ठ संचालक निवृत्ती काळे यांनी सांगितले की, कोरोनाची पार्श्वभूमी व निसर्ग चक्री वादळ, गारपीट यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षी टोमॅटो उत्पादन व उलाढाल यात मोठी घट झाली आहे. याचा थेट फटका टोमॅटो उत्पादकांना बसला आहे. सन २०१८, सन २०१९ मध्ये जून व जुलै या दोन महिन्यांत उपबजारात अनुक्रमे २५ लाख क्रेट, २६ लाख २५ हजार क्रेटची आवक झाली होती. सन २०१८, सन २०१९ मध्ये जून व जुलै या दोन महिन्यांत उपबजारात टोमॅटो खरेदी विक्रीतून अनुक्रमे ७३ कोटी १६ लाख रुपयांची, ९८ कोटी ९१ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी मागील दोन महिन्यात ११ लाख टोमॅटो क्रेटची आवक कमी होऊन उलाढालित सुमारे ४७ कोटी रुपयांची घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com