‘पीएमपी’ राबविणार उद्या ‘बस डे’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मार्गांवर सुमारे १७०० बस आणायच्या आणि दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवायचे, असा निर्धार पीएमपीने केला आहे. त्यासाठी सोमवारी (ता. १०) ‘बस डे’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मार्गांवर सुमारे १७०० बस आणायच्या आणि दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवायचे, असा निर्धार पीएमपीने केला आहे. त्यासाठी सोमवारी (ता. १०) ‘बस डे’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘बस डे’साठी पीएमपीच्या १४ आगारांमधील चालक-वाहकांची सोमवारची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे. पीएमपीच्या सध्या सरासरी १५०० बस मार्गांवर धावतात व सुमारे एक कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दोन्ही महापालिकांकडून ‘पीएमपी’ला संचलनाची तूट म्हणून काही रक्कम मिळते. त्यातून पीएमपीचा कारभार सुरू आहे.

लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम

पीएमपीमध्ये सुमारे १४०० कर्मचाऱ्यांना नुकतीच बढती मिळाली आहे; तसेच सुमारे ३०० चालकांनाही घेण्यात आले आहे. पीएमपीमध्ये होत असलेले हे बदल लक्षात घेऊन ‘बस डे’चा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. ‘सकाळ’ने १ नोव्हेंबर २०१२ रोजी ‘पुणे बस डे’ साजरा केला होता. लोकसहभागातून त्या दिवशी सुमारे दोन हजार बस रस्त्यांवर आणल्या होत्या. त्या दिवशी शहरातील प्रदूषणात घट होऊन, वाहतूक कोंडीमुक्त शहर झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow Bus day by pmp