अय्यंगार योगा-सरावाविषयी उद्या वेबिनार

मानसिक ताणतणाव दूर करून एक निरोगी जग, निरोगी समाज कसा निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Rajeshri Tupe
Rajeshri TupeSakal

पुणे - मानसिक ताणतणाव दूर करून एक निरोगी जग, निरोगी समाज कसा निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ‘अय्यंगार योगा-सराव, (Iyengar Yoga Practice) तत्वज्ञान आणि मानसिक आरोग्य’ या विषयी शनिवार (ता. २१) दुपारी १२ वाजता वरिष्ठ अय्यंगार योग शिक्षिका आणि श्रीयोग इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका राजेश्री तुपे यांची सशुल्क मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

राजेश्री तुपे यांनी वरिष्ठ अय्यंगार योग अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच गुरुजी बीकेएस अय्यंगार, गीताजी आणि प्रशांतजी अय्यंगार यांच्याकडे दोन दशकांहून अधिक काळ योग साधनेचा अभ्यास केला आहे. योगामध्ये उपचार करण्याची प्रचंड शक्ती आहे आणि ती प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, त्याचबरोबर ती एक कला आणि विज्ञान आहे.

Rajeshri Tupe
पुणे : पोलिसांमुळे घराचा आधार गेला; सुरेश पिंगळे यांच्या पत्नीचा आक्रोश

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या we are in this together या मोहिमेअंतर्गत मानसिक ताण-तणाव व एकूणच मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांच्या समुपदेशनासाठी सुरु केलेल्या ‘सकाळ सोबत बोलूया’ या मोफत हेल्पलाइनच्या वर्षपूर्तीनिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शन कार्यशाळा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाइन झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहेत. यातील तिसरी मार्गदर्शन कार्यशाळा उद्या होत आहे.

स्वयंसेवी संस्थेला मदत

ऑगस्ट महिन्यात प्रत्येक शनिवारी होणाऱ्या मार्गदर्शन कार्यशाळेसाठी नाममात्र १४९ रुपये शुल्क आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शुल्करूपी जमा होणारा निधी हा बेघर-निराधार, मानसिक विकलांग व मनोरुग्णांचा सांभाळ करणाऱ्या वाई तालुक्यातील यशोधन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देणार आहे.

याबाबत होणार मार्गदर्शन

  • आसनांच्या अभ्यासाद्वारे योगाची शक्ती व प्रभाव.

  • आसन आणि प्राणायामाच्या सरावाने आपल्या शरीराद्वारे मनाचा अभ्यास करणे.

  • आसनांमध्ये शरीराच्या हालचाली इनहेलेशन आणि श्वासोच्छवास यांचा समतोल साधने.

  • प्रॉप्स योग संकल्पना.

  • योगसाधना आणि ऊर्जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com