

Torna Fort Conservation | Nilesh Lanke Campaign
esakal
राजगड : छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक तोरणागडावर शनिवार (ता.२८) रोजी शेकडो मावळ्यांच्या सहभागातून स्वच्छता व संवर्धनाचा जागर करण्यात आला. खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आपला मावळा सामाजिक संघटना व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेली ही अभियानाची १८वी मोहीम ठरली. यावेळी स्वच्छतेसोबत वृक्षारोपण, डस्टबीन, दिशादर्शक फलक आणि पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली.