
तोरणागडावर दोन दिवसात दोन तरुण पर्यटकांचा मृत्यू
वेल्हे, (पुणे) : तोरणागडावर दोन दिवसांत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही तरुण पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. आज रविवारी (दि.१३) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तोरणागडावर चढाई करताना ओंकार महेशकुमार भरमगुंडे (वय २१, सध्या राहणार पुणे, मुळ राहणार कराड ) याचा डोक्यात दगड कोसळुन तर काल शनिवारी दुपारी गडावर चढाई करताना पाऊलवाटेवर अत्यवस्थ होऊन निरंजन नितीन धुत (वय, २२, रा. वारजे, पुणे ) महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाले.
आज सकाळी ओंकार भरमगुंडे हा आपल्या मित्रांसोबत तोरणागडावर फिरण्यासाठी आले होते. तोरणागडाच्या तटबंदी खाली बिन्नी दरवाजाच्या अखेरच्या टप्प्यावर सर्व जण रेलींग च्या पायऱ्या चढत होते. त्यावेळी गडाच्या तटबंदीच्या बुरजावर माकडांची भांडणे सुरू होती. त्यावेळी एक मोठा दगड बुरजावरुन कोसळून ओंकार याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. त्यांच्या शरीरातुन रक्तस्त्राव झाला. तो जागीच निपचित पडला. घटनेची माहिती मिळताच गडावरील सुरक्षा रक्षक राजु बोराणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गडावर जाणारे कोल्हापूर येथील अभिजित पाटील हे गडावर न जाता थांबले.अभिजित यांनी गंभीर जखमी ओंकार याला आपल्या पाठीवर घेतले.
ओंकार यांच्या जखमांतुन रक्तस्राव सुरू होता. त्याला तातडीने उपचार मिळावे यासाठी अभिजित न थांबता वेगाने पाऊस वाटेने गडाच्या पायथ्याकडे धावत होते.त्यांचे सहकारी अक्षय ओंबळे ,गुणवंत सावळजाकर आदी मित्र ओंकार याच्या मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते सुनिल राजिवडे हे पोलीस तसेच रुग्णवाहिका घेऊन गडाच्या पायथ्याच्या वाहनतळावर दाखल झाले. तेथून ओंकार याला वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारा पुर्वी मुत्यू झाला. असे डॉ.चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले. ओंकार यांच्या मुतदेहाचे शवविच्छेदन डॉ. भोईटे यांनी केले. त्यानंतर मुतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला.
काल शनिवारी सकाळी वारजे येथील निरंजन धुत हा महाविद्यालयीन तरुण ओजस नेटके, ओंजस जाधव, विशाल दाणे आदी मित्रांसोबत तोरणागडावर फिरण्यासाठी आला होता. गडाच्या पायथ्याच्या वाहतळावर मोटारसायकल उभ्या करुन सर्वजण गडाच्या पाऊलवाटेने चालले होते. दुपारी पायी मार्गावरील उंबराच्या झाडाजवळ निरंजनला अस्वस्थ वाटू लागले. उलटी होऊन त्याला घाम आला. मित्रांनी त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्याने मला बर वाटत आहे. मी गड पाहिला आहे. तुम्ही गडावर जा असे मित्रांना सांगितले.
निरंजन हा गडावर न जाता पाउल मार्गावर थांबला. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निरंजन याने मित्रांना हात दाखवले. त्यानंतर निरंजन हा बेशुद्ध पडला. तेथून निरंजन याला उचलून मित्रांनी खाली आणले. वाहनतळावरील रुग्णवाहिकेतून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डाँक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो उपचारा पुर्वी मयत झाला असल्याचे डाँक्टरांनी सांगितले.
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, बांदल, अजय साळुंखे, शिंदे आदी पोलीस जवानांसह गडाचे सुरक्षा रक्षक स्थानिक कार्यकर्ते, रुग्णवाहिकेचे डॉक्टर, कर्मचारी मदत कार्यात सहभागी झाले होते.
Web Title: Torna Fort Trekkers Death Two College Student
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..