वेल्हे : छत्रपतींचा किल्ले तोरणा गड पुन्हा अंधारात

महावितरण व वनविभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
Torna Fort
Torna FortSakal

वेल्हे, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) किल्ले तोरणा (Torna Fort) गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधून रयतेच्या स्वराज्याची (Swarajya) निर्मिती केली. सरकारच्या प्रयत्नातून काही दिवसांपूर्वी तोरणा गडावर वीज आली आणि गड प्रकाशमान झाला. मात्र काही दिवसांतच शासनाच्या वन विभागाला (Forest Department) तोरणागडावर गेलेल्या विजेचे खांब वन विभागाच्या हद्दीतून गेल्याचे वन विभागाला मान्य नाही. वन विभागाने महावितरणने पूर्ण केलेल्या या कामावर आक्षेप घेतल्याने प्रकाशमय झालेल्या तोरणागडावर पुन्हा अंधार झाला आहे. महावितरण व वनविभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने सदर परिस्थिती ओढावली असल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

किल्ले तोरणा स्वराज्याचे पाहिले तोरण, किल्ले तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे ,लाखो शिवप्रेमींचे श्रध्दास्थान या किल्ल्यावर शिवप्रेमी व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते गडावर जाणारा मार्ग व किल्ला प्रकाशमान होण्यासाठी अनेक शिवप्रेमींची मागणी होती त्यानुसार दोन वर्षांपूर्वी गड विद्युतीकरणासाठी निधी मंजूर झाला होता परंतु काही स्थानिक कारणांमुळे हे काम थांबले होते.

Torna Fort
ST संप मागे! काय झाल्या वाटाघाटी? वाचा सरकारच्या 10 प्रमुख घोषणा

अगदी मागच्या महिन्यापर्यंत तोरणागड अंधारात होता काम पूर्ण झाले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार वेल्हे दौऱ्यावर असताना मंगळवार ता.३० नोव्हेंबर २०२१ रोजी गडावरील विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते व तोरणागड प्रकाशमान झाला . विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता या कामामध्ये ११ केव्हीच्या वाहिनीसाठी २७ विजेचे खांब तर लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले.

तर १८०० मीटर लांबीची भूमिगत विजवाहिनी दर्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तर १०० केव्हिए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी घाटमाथ्यावर डोंगरदऱ्या तुन खांद्यावर विजेचे खांब व इतर साहित्याची वाहतूक केली होती.

यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालकासहीत सर्व अधिकारी उपस्थित होते .परंतु असे असताना वनविभागास उद्घाटनानंतर उपरती झाली असून हा विजेचा पुरवठा झालेल्या काही भागामध्ये वनविभागाची हद्द असल्याचे उशिरा निदर्शनास आले व कामावर हरकत घेत यांनी सदरचा विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना महावितरणला दिला असून गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दिवा पेटला नसून किल्ले तोरणा अंधारात आहे.

याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य ,व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी किल्ला अंधारात असल्याकडे लक्ष वेधले असून याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य,राष्ट्रवादीचे सरचिटणीस आनंद देशमाने ,माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष विकास नलावडे, सुनील राऊत, अंकुश पासलकर, राजू पांगारे, आदी उपस्थित होते.

याबाबत महावितरणचे उपकार्यकरी अभियंता नवनाथ घाटूळे म्हणाले, 'हे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले तर रखडलेले काम एक ते दीड महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू झाले होते या ठिकाणी ५० ते १००कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत असताना त्यावेळेस वन विभागाने कोणत्याही प्रकारची हरकत दिली नाही परंतु विद्युतीकरणामधील काही भाग वन विभागाच्या हद्दीत येत आहे असे सांगून किल्ल्यावरची लाईट गेले काही दिवसांपासून बंद आहे.'

तर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगुटे म्हणाले, 'शासकीय नियमानुसार विद्युतीकरण करतेवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वनविभागास कळवणे गरजेचे होते तशी परवानगी घेणे अपेक्षित असताना कोणतीही परवानगी घेतली गेली नाही तर याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत मोजणी करून सर्वे केला जाईल'.

Torna Fort
अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची घोषणा

माजी जिल्हा परिषद सदस्य व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर म्हणाले, 'तोरणा गडावरची विद्युत पुरवठा बंद असल्याने याबाबत अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे तरी तोरणा गडावरील विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com