खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार 

अनिल सावळे
Tuesday, 22 September 2020

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा 29.08 टीएमसी (99.77 टक्‍के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 29.13 टीएमसी (99.94 टक्‍के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर, टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. 

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात मुसळधार तर, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. मात्र, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा 29.08 टीएमसी (99.77 टक्‍के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 29.13 टीएमसी (99.94 टक्‍के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर, टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. 

खडकवासला धरणातून सायंकाळपर्यंत मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आलेला नव्हता. परंतु रात्री पाऊस वाढल्यास नदीतून विसर्ग सुरू करण्यात येण्याची शक्‍यता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्‍त केली. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून आजपर्यंत 11.03 टीएमसी पाणी मुठा नदीतून सोडण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
खडकवासला 1.97 (100) 
पानशेत 10.65 (100) 
वरसगाव 12.82 (100) 
टेमघर 3.64 (98.19) 

अन्य काही धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
पवना 8.46 (99.44) 
भामा आसखेड 7.46 (97.85) 
मुळशी 18.46 (100) 
ेकळमोडी 1.51 (100) 
चासकमान 7.49 (98.84) 
आंद्रा 2.92 (100) 
गुंजवणी 3.69 (100) 
भाटघर 23.51 (100) 
नीरा देवघर 11.73 (100) 
वीर 9.41 (100) 
डिंभे 12.49 (99.96) 
उजनी 58.46 (109.12) 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(edited by : Sharayu Kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A torrential rainfall in the catchment area of ​​Khadakwasla Dam