kanersar rain water
sakal
दावडी - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कनेरसर परिसराला बसला असून विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गावातील ओढ्यावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याचा भराव वाहून गेला आणि सडकवस्ती परिसरात एक ट्रेलर पलटी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.