
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ७१८
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या (corona patient) संख्येत मंगळवारच्या (ता.१४) तुलनेत बुधवारी (ता.१५) ७१ ने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा १ हजार ७१८ झाली आहे. हीच संख्या मंगळवारी १ हजार ७४७ इतकी होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील १२० नवे रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ४९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५७, नगरपालिका हद्दीत ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा: एज इज जस्ट अ नंबर ;गुरमित सिंग
याशिवाय दिवसात जिल्ह्यातील दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.
बुधवारी दिवसभरात १६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९, नगरपालिका हद्दीतील सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार १४३ जण गृह विलगीकरणात आहेत.
Web Title: Total Number Of Active Corona Patients In Pune Is One Thousand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..