लोणावळ्यात पर्यटकांची वर्दळ वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

लोणावळा - गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये चैतन्य पसरले. पाऊस सुरू होताच वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. लोणावळा परिसरातील सहारा पुलाजवळील धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची पॉइंट, लोहगड, कार्ला, भाजे आदी ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची ठरत आहे. भुशी धरण मात्र अद्याप भरले नसल्याने आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेले लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची अलोट गर्दी झाली होती.

लोहगडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला. येथे पर्यटकांच्या वाहनांनी पार्किंग फुल्ल झाली होती. तर दुसरीकडे बेशिस्त पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यालगतच उभी केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. लायन्स पॉइंटवरून परतताना लोणावळा ते आंबवणे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism lonavala