
महाराष्ट्रातील पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवर बांधलेला एक जीर्ण पूल कोसळला. पुल कोसळला तेव्हा त्यावर अनेक पर्यटक उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे नदीतील वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी पर्यटक गेले होते. पूल कोसळल्याने सुमारे २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले.