ट्रॅक्टरच्या रोटर मधे अडकून एकाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या रोटर मधे अडकून एकाचा मृत्यू
Published on

ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून एकाचा मृत्यू

हुमगाव, ता. १२ ः बामणेवाडी (वालूथ) येथील रामभवन रामसजीवन बर्मा (वय ४५) या ट्रॅक्टर चालकाचा रोटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मूळचे बामणेवाडी व सध्या पुणेस्थित उद्योजक असलेल्या गुलाबराव भिलारे यांच्या आनंद शेती फार्मवर हा प्रकार घडला.
याबाबत करहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामभवन बर्मा हा मूळचा भैसोधा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, २००७ पासून तो भिलारे यांच्या आनंद ॲग्रो फार्महाऊसवर कुटुंबासह कामाला होता. काल सकाळी ११ वाजता तो ट्रॅक्टर घेऊन शेतात रोटर मारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड वाजता दुसरा शेतमजूर रामचंद्र भिकू मेंगडे हा ट्रॅक्टर जवळून जात असताना ट्रॅक्टर चालू स्थितीत होता. मात्र, रामभवन त्याठिकाणी दिसत नव्हता. त्यामुळे त्याने ही माहिती दुसरा शेतमजूर रामलू दंडू याला दिली. त्यानंतर रामलूने ट्रॅक्टरची पाहणी केली असता रामभवनचा ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
रामभवन हा एकटाच त्यावेळेस संबंधित शेतात असल्याने तो रोटरमध्ये अडकलेल्या स्थितीत ट्रॅक्टर जवळपास दोन तास सुरूच राहिल्याने रामभवनच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते. ट्रॅक्टर सुरूच ठेवून रोटरमध्ये अडकलेला कचरा काढण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत रामलू भिमय्या दंडू याने करहर पोलिस ठाण्याला फिर्याद दाखल केली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास गंगावणे व हवालदार मनोज जायगुडे करत आहेत.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com