Pune News: पुण्यात मोहरमनिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक
Muharram 2025: पुण्यात मोहरमच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागांत पारंपरिक ताबूत, पंजा, छबिल मिरवणुका शांततेत व भक्तिभावाने पार पडल्या. "ये अलविदा..." च्या गजरात मुस्लिम बांधव, सामाजिक संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
पुणे : मोहरमनिमित्त पुण्यातील मध्यवर्ती भागांत मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने ताबूत, पंजे, छबिले यांची मिरवणूक काढली. ‘ये अलविदा, ये अलविदा... शाहेशही दो अलविदा’ असे म्हणत या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला होता.