शिरूर - कुणी स्वसंरक्षणार्थ शिरस्त्राण म्हणून... कुणी ऊन, वारा व थंडीपासून बचावासाठी... कुणी केवळ हौसेखातर रुबाबदार दिसण्यासाठी तर कुणी वाडवडिलांची परंपरा जपावी म्हणून डोक्याला फेटे बांधत असले तरी फेटेधाऱ्यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. खेडेगावातूनही फेटा बांधण्याचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरल्याने काही काळानंतर फेटेधारी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.