गोट्या, लगोर, सुरपाट्या खेळायचंय, चला बारामतीत

Lagori
Lagori

बारामती (पुणे) : आभासी दुनियेत हरवत चाललेले बालपण, मातीचा स्पर्श पायाला होण्याऐवजी हाताची बोटे मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होतात. परस्परांशी असलेला संवाद हरवताना डिजिटल दुनियेत मित्रांचा सुरू असलेला शोध, अशा वेगाने बदलत्या वातावरणाला बदलून मुलांना मातीत मिसळता यावे, या उद्देशाने सर्वप्रथम बारामतीतील एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने मातीतल्या खेळांची जत्रा सुरू करण्यात आली. रविवारी (ता. 12) सकाळी सहा ते दहा या वेळेत भिगवण चौकातील शारदा प्रांगणात मातीतील खेळांच्या जत्रेचे आयोजन केल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विनामूल्य या खेळांचा आनंद लुटता येणार आहे.

गेली दोन वर्षे सातत्याने हा उपक्रम बारामतीत आयोजित केला जातो. विशेष म्हणजे केवळ लहान मुलेच नाही तर मोठेही आपले मोठेपण विसरून जत्रेत सहभागी होतात. मन आणि शरीरावरही विपरीत परिणाम करणाऱ्या मोबाईलच्या चक्रव्यूहातून बाहेर येत मातीतले खेळ मुलांनी खेळावे, त्यांना आपल्या पारंपरिक खेळांची माहिती व्हावी आणि त्यांचे मन व शरीर सुदृढ राहावे, असा उद्देश नजरेसमोर ठेवत सुनेत्रा पवार यांनी ही संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात उतरविली. जे खेळ आता काळाच्या पडद्याआड जाऊ पाहत आहेत, अशा खेळांना पुन्हा ऊर्जितावस्था यावी हा त्यांचा प्रयत्न आहे.

गोट्या, लगोर, सुरपाट्या आणि बरंच काही...
गोट्या, लगोर, सुरपाट्या, टायर पळविणे, विटीदांडू, तळ्यात मळ्यात, पोत्यातील उड्या, भोवरा खेळणे, लंगडी, फुगडी, माझ्या आईच पत्र हरवलं, जिबल्या, गजगे, दोरीवरच्या उड्या, अशा अनेक खेळांसह नंतर मनसोक्त नृत्य अशी धमाल या मातीतल्या खेळांच्या जत्रेत मुले करतात. जे खेळ आता फक्त पुस्तकात वाचून किंवा इंटरनेटवर पाहूनच समजतात, असे खेळ बारामतीत प्रत्यक्ष खेळायला मिळणे मुलांना मातीतल्या जत्रेमुळे शक्‍य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com