पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय आवश्यक : डाॅ. काळकर

रमेश मोरे 
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शिक्षण प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यासाठी पारंपारिक शिक्षण पद्धतीला नवीन पर्याय देणे आवश्यक आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

जुनी सांगवी (पुणे) : कोवीड -19 सारख्या विषाणुमुळे आज सर्व शाळा व महाविद्यालयांना अनिश्चित काळासाठी सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याला अडथळा निर्माण झालेला आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शिक्षण प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यासाठी पारंपारिक शिक्षण पद्धतीला नवीन पर्याय देणे आवश्यक आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व बीएमएस सोल्युशन्स, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'एम्पॉवरिंग टीचर्स: फॉर ऑनलाइन टिचिंग अँड लर्निंग' या विषयावर झुम अॅपवर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव हे होते व प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, व्याख्याते दत्ता मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे यांनी या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यामागचा उद्देश व महत्व स्पष्ट केला. ते म्हणाले की, ''महाविद्यालय बंद असल्यामुळे शिक्षण प्रक्रिया थांबलेली आहे. अशा वेळेस ऑनलाईन टिचींग व लर्निंगचे प्रशिक्षण शिक्षकांना मिळावे यासाठी हे आंतरराष्ट्रीय वेबिनार आहे." 

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याप्रसंगी या वेबिनार साठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहिलेले व प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले संस्थेचे माजी विद्यार्थी, बीएमएस सोल्युशन्स दुबई चे संचालक दत्ता मांदळे यांनी अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाइन लर्निंग व टिचींग प्रक्रिया उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी फोल्डर तयार करणे, व्हिडीओज अपलोड करणे, लाईव्ह क्लासेस आयोजित करणे, नवीन असाइनमेंट व सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेल्या ऑनलाईन परीक्षेबाबत कशी तयारी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. या आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे 180 पेक्षा जास्त प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traditional teaching methods need alternatives says Dr. kalkar