पुणे - शहरातील वाहतूक कोंडी पुणेकरांना नवीन नाही. कधी खड्डे, पाऊस, तर कधी मंत्र्यांचे दौरे, सण-उत्सव किंवा भव्यदिव्य कार्यक्रम. अशा विविध कारणांमुळे होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्य पुणेकरांच्या आता अंगवळणी पडली आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटले नाहीत.