Pune Mumbai Expressway Traffic Jam
sakal
पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह एसटी प्रशासनालाही बसला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या पुणे विभागाच्या १७२ शिवनेरी बस बुधवारी रद्द झाल्या, तर नऊ सर्वसाधारण (लालपरी) बसदेखील रद्द केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या बसनाही मोठा फटका बसला. परिणामी, एसटीच्या पुणे विभागाचे एक दिवसाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.