पुणे - विकास आराखड्यात दाखविण्यात आलेल्या रस्त्यांच्या जागा ताब्यात न येणे, तसेच रुंदीकरणापूर्वीच अनेक मोठ्या इमारती उभे राहत असल्याने कोथरूड व परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे..कोथरूडमधील विकास आराखड्यातील मिसिंग लिंक, बोगदे एकमेकांना जोडल्यास पर्यायी रस्ते उपलब्ध होऊन अन्य रस्त्यांवरील भार कमी होऊ शकतो. पण ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे.कोथरूडमध्ये विकास आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण सुचविले आहे, पण भूसंपादनातील अडचणी दूर होत नसल्याने रस्ता पूर्ण होत नाही, अशी स्थिती आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गेल्या महिन्यात महापालिकेत बैठक घेऊन मिसिंग लिंकचे रस्ते पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे..पुणे महापालिकेने शहरातील मिसिंग लिंकच्या रस्त्यांचे सर्वेक्षण केले आहे. शहरात ७०० मिसिंग लिंक असून, त्यांचे अंतर ५२० किलोमीटर इतके आहे. त्यापैकी कोथरूडमधील मिसिंग लिंकच्या रस्त्यांची लांबी ही २३ किलोमीटर तर कर्वे रस्ता परिसरातील मिसिंग लिंकची लांबी ८.९२ किलोमीटर आहे.म्हणजेच कोथरूड व परिसरातील सुमारे ३२ किलोमीटरचे रस्ते केवळ कागदावरच आहेत. कोथरूडमधील लोकसंख्या, वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची लांबी तसेच रुंदी वाढत नसल्याने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे..सुतारदरा - पाषाण बोगदा कागदावरचकोथरूडवरून बाणेर, बालेवाडी भागात जाण्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुतारदरा ते पाषाण आणि पंचवटी ते पाषाण असे दोन बोगदे दाखविण्यात आले आहेत. सुतारदरा ते पंचवटी पाषाण या बोगद्याची एकूण लांबी १.५७ किलोमीटर असून, त्यातील बोगद्याचा भाग हा ९५० मीटरचा असणार आहे.सेनापती बापट रस्ता ते पंचवटी या बोगद्याची एकूण लांबी ८०० मिटर असून, त्यातील बोगद्याचा भाग ५५० मीटरचा असेल. या प्रकल्पासाठी सुमारे ३१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा प्रारूप व्यवहार्यता अहवाल पालिकेला प्राप्त झाला असला तरी कार्यवाही झालेली नाही..हे आहेत प्रमुख अर्धवट रस्तेयशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून गांधी भवनकडे जाणाऱ्या डीपी रस्त्यावर कमिन्स कंपनीच्या मागील बाजूस दीड गुंठा जागेमुळे रस्ता बाधित होत आहे. या जागेच्या संपादनाबाबत तोडगा निघत नसल्याने अखेर येथे सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.कर्वे पुतळा ते मयूर कॉलनीला जोडणारा डीपी रस्ता मीनल सोसायटीमधून जातो. हा रस्ता झाल्यास मोठा फेरा टळणार आहे.भीमनगर येथे रस्त्यात स्वच्छतागृह आहे. या ठिकाणचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाल्याने रस्ता खुला करता येऊ शकतो.वारजेतील आंबेडकर चौकापासून तिरूपतीनगरमार्गे रोझरी शाळेपर्यंतचा रस्ताही डीपीमध्ये दर्शविला आहे. हा रस्ता सेवा रस्त्याला पर्यायी रस्ता ठरेल. मात्र, हा रस्ता बीडीपी आरक्षणातून जातो. जागामालकांनी निवासी दराने भरपाई मागितली आहे..यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील जागाही ताब्यात नाही, तेथील जागेचा प्रश्न सुटल्यास मोठा रस्ता उपलब्ध होऊ शकतो.कर्वेनगर येथील डीपी रस्त्याच्या अंमलबजावणीसाठी जावळकर उद्यानाशेजारील रहिवाशांच्या मिळकती बाधित होणार आहेत. मोजणीचा खर्च महापालिकेने करावा, अशी मिळकतधारकांची मागणी आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.आनंदनगर येथे मेट्रो स्थानकाखाली पौड रस्ता अरुंद आहे. ती जागा ताब्यात घेता आलेली नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.