Pune Traffic : लोहगाव वडगाव शिंदे मार्गावर वाहतूक कोंडीचं संकट कायम नागरिक त्रस्त
Lohegaon Road : लोहगाव येथून पुणे शहराकडे जाणाऱ्या हवाई दल रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्ता आणि वाढती वाहने यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पुणे : लोहगाव येथून शहराकडे जाणाऱ्या वायुसेना हद्दीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. शहराकडे जाणारा हा सोपा आणि जवळचा मार्ग असल्याने लोहगाव, वडगाव शिंदे, गोलेगाव, पिंपळगाव या गावांतील नागरिक या रस्त्याचा वापर करतात.