
किरकटवाडी : वडगाव खुर्द येथील कै. दत्तात्रेय नवले अग्निशमन केंद्रासमोरील मद्यविक्रीच्या दुकानांत येणारे ग्राहक आपली वाहने दुकानासमोरील रस्त्यावरच लावतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. महापालिका व वाहतूक पोलिस प्रशासनाने अशा दुकानदारांसह वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.