कात्रज चौक ते दत्तनगर चौक रस्त्यावर वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कात्रज चौक ते दत्तनगर चौक रस्त्यावर वाहतूककोंडी

कात्रज : अवजड वाहनांची होणारी सर्सास वाहतूक, अरुंद रस्ता आणि अतिक्रमणे यामुळे कात्रज चौक ते दत्तनगर चौक रस्त्याला वाहतूक कोंडीने घेरले आहे. अवजड वाहनांना या रस्त्यांवर बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. अवजड वाहने प्रवास करत असल्याच्या २०० मीटर अंतरावर मुख्य कात्रज चौकात वाहतूक पोलिसांचा गराडा असतो. वाहतूक पोलीसांमार्फत या अवजड वाहन चालकांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अवजड वाहन चालकांवर कारवाई करुन वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे. (Pune News)

अवजड वाहतूकीला बंदी असल्याचे फलकही याठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवरून सर्सास अवजड वाहतूक होते . रस्त्यावरून मोठे अवजड ट्रक, डंपर व मिक्सर वाहतूक करतात. आंबेगाव, जांभुळवाडी, दत्तनगर, कोळेवाडी या भागाकडे जाण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यांवरून आधीच लहान वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये अवजड वाहनांमुळे वाहतूक संथ गतीने होते. तसेच अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून काहीठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

हेही वाचा: अखेर ; पिंपळ्यातील अतिक्रमण जिल्हाधिकाऱयांनी हटविले

कात्रज चौकातून या रस्त्यांवर येताना सुरुवातीलाच सूचनेचा एक फलक लावण्यात आला आहे. त्यावर अवजड वाहनांना बंधने घालण्यात आल्याची स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रस्त्यांवर रिक्षा लावले जात असल्याने रस्त्यावरून अन्य वाहनांना प्रवास करणे कसरतीचे बनले आहे.

हेही वाचा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राजभवनावर; 'या' विषयावर झाली खलबते

कात्रज चौक ते दत्तनगर चौक येथे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांकरिता ठराविक वेळेसाठी बंधने आहेत. तरीही याव्यतिरिक्त अन्य वेळेमध्ये अवजड वाहने या रस्त्यावरून वाहतूक करताना आढळल्यास त्यांच्यावर नियमीत कारवाई करणे सुरु आहे.

- उदयसिंह शिंगाडे, पोलिस निरिक्षक, वाहतूक विभाग, भारती विद्यापीठ

अरुंद रस्ता असून त्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्यांवरून वेळेचे कुठलेही बंधन न पाळता सर्सास अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी न करता पूर्णवेळ बंदी करायला हवी.

- बाजीराव कोंढाळकर, स्थानिक नागरिक

टॅग्स :Pune News