
मुंढवा : केशवनगर, मुंढव्यात मागील वर्षात वाहनांची संख्या १० पट वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे, मात्र १० ते १२ वर्षांपासून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहेत. त्यामुळे येथील नागरिक कोंडीत गुदमरून जातात की काय, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.