Traffic Diversions on Ahilyanagar Road for Vijaystambh Salutation Ceremony
sakal
पुणे - कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गासह परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. संभाव्य गर्दी, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून एक जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.