कोकणात निघालेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे  :  मंगळवारी आलेली नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवारीच कोकणात फिरायला निघालेल्या पर्यटकांना वाहतूककोंडीचा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः अमृततांजन पुलाजवळ अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत आहे.

पेण ते वडखळदरम्यान खराब रस्ते आणि वाहनांची संख्या अचानक वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. येथील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. ही वाहतूककोंडी होणार हे माहिती असल्याने येथील पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने मुंबई-गोवा तसेच वडखळ- अलिबाग मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 23 ते २५ डिसेंबरदरम्यान आणि 30 ते 1 तारखेच्या दरम्यान अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Traffic Jam on Highway due to Christmas