
बारामती : शहरातील भिगवण रस्त्यावर अनेक ठिकाणी विशेषतः पेन्सिल चौकात होणारी वाहतुकीची कोंडी हा वाहनचालकांसाठी कटकटीचा विषय बनत आहे. बारामतीत आता ट्रॅफिक सिग्नल तातडीने बसवावेत व मुख्य चौकात गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.