Pune News : हांडेवाडी आणि महंमदवाडी या दोन्ही रस्त्यावरील वाहतूककोंडी

हांडेवाडी रस्त्यातल्या खाड्यांमुळे वाहनचालक-प्रवासी त्रासले
दोन्ही रस्त्यावरील वाहतूककोंडी
दोन्ही रस्त्यावरील वाहतूककोंडी sakal

उंड्री- जलवाहिनी, मलवाहिनी विविध कंपन्यांच्या केबल्स कामासाठी सय्यदनगर रेल्वे गेट-हांडेवाडी चौक दरम्यानच्या रस्त्याचे वारंवार खोदाई केल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती केली जात नाही.

रस्ता खोदणाऱ्याकडून रस्ता करण्यासाठीची अनामत रक्कम जमा करून घ्यावी आणि रस्ता केला तरच ती परत करावी, असा सबुरीचा सल्ला सवाल स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी प्रशासनाला दिला आहे.

सय्यदनगर रेल्वेगेट-हांडेवाडी चौक आणि महंमदवाडी रस्त्यावर विविध कारणासाठी वारंवार खोदाई केली जात असल्याने वाहनचालक आणि स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चढ-उतार नव्हे डांबरी रस्ता असला तरी तो खड्डे बुजविल्यानंतर वर-खाली झाल्यामुळे वाहने आदळत आहेत.

त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना पाठीच्या मणक्याचा त्रास वाढला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या वेळांत वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूककोंडीचा सामना नागरिक-वाहनचालकांना करावा लागत आहे. रस्ता केला जात नसेल, तर खोदाईला परवानगी का देता असा संतप्त सवाल गुलाब वाडकर, खंडेराव जगताप, अश्विनी शिवरकर, शीतल जाधव, संतोष सातव यांनी उपस्थित केला.

सय्यदनगर रेल्वेगेटपासूनचे हांडेवाडी आणि महंमदवाडी या दोन्ही रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एकेरी मार्ग केला आहे. मात्र, अनेक दुकानदारांनी पोटभाडेकरून ठेवल्याने रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

त्यातच गॅस, केबल, जलवाहिनी, मलवाहिनी या कामासाठी वारंवार रस्त्याची खोदाई केली जाते. मात्र, त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण न करता खडी-माती आणि त्यावर डांबर टाकून ठेकेदार निघून जातात.

पालिका प्रशासनाने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून डांबरीकरण करावे आणि रस्ता खोदल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून समतल रस्ता केलाच पाहिजे, असे डॉ. अनिल पाटील, योगेश गायकवाड यांनी सांगितले.

हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर, श्रीराम चौक, सातव चौक, महात्मा फुले चौकदरम्यानचा रस्ता आहे की खड्डे आहेत, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ वाढली असल्याने खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

-खंडू जगताप, चिंतामणीनगर

दरम्यान, सय्यदनगर-हांडेवाडी, महंमदवाडी रस्त्याचे काम नव्याने काम केले जाईल, त्यामध्ये रस्ता समतल करण्याविषयी नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार रस्ता करताना समतल करावा, अशी सूचना देण्यात येतील, असे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com