Pune : वाहतूक वळविल्याने शिवणे उत्तमनगरला वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

वाहतूक वळविल्याने शिवणे उत्तमनगरला वाहतूक कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : पानशेत रस्त्याचे खडकवासला नांदेड परिसरात सुरू असलेल्या कामामुळे पानशेतहुन पुणेकडे जाणारी वाहतूक खडकवासला येथून ही वाहतुक शिवणे मार्गे वळविण्यात आल्यामुळे शिवणे परिसरात रविवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पानशेत रस्तावरील वाहतूक खडकवासला येथून वळविली. ती सर्व वाहतूक कोपरे, कोंढवे- धावडे, उत्तमनगर शिवणे मार्गे पुण्यात गेली. वळविलेल्या वाहतुकी मुळे शिवणे रस्त्यावरील वाहतूक अधिक प्रभावीत झाली. रविवारी रात्री उत्तमनगर बसथांबा, भाजी मंडई ते अचानक चौक, रंग कपड्याचे दुकान ते नवभारत चौक शिवणे, राहुल नगर, कामठे वस्ती पूल, शिंदे पूल येथे वाहतूक कोंडी होते. तसेच पुणे पानशेत रस्त्यावरील खडकवासला गावाकडे जाणारी वाहतूक देखील नांदेड सिटी गेट येथून वळविल्याने शिवणे गाव ते नवभारत चौक या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. नवभारत चौकात वाहतूक पोलीस, स्वयंसेवक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते.

याबाबत, वारजे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ऍप शिंदे यांनी सांगितले की, खडकवासला परिसरातून वाहतूक वळविल्याची माहिती वारजे वाहतूक विभागाला अद्याप मिळाली नाही. रविवारी, महामार्गावरील वाहतूक वारजे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. चांदणी चौकात देखील वाहतूक कोंडी तसेच शिवणे नवभारत चौक, उत्तमनगर मंडई परिसरात वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, कर्मचारी तेथे पाठविले

loading image
go to top