लोहगाव रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात आजपासून बंद

सकाळी 11 वाजल्यापासून बॅरिकेट्स लावून हा रस्ता बंद
आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाणारा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.
आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाणारा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.sakal

वाघोली : वाघोलीतील पुणे नगर महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी आव्हाळवाडी चौकातून ( केअर हॉस्पिटल ) लोहगाव रस्त्याकडे जाणारी व येणारी वाहतूक तुकाराम महाराज मंदिरापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आजपासून बंद करण्यात आली. लोहगाव कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहांमुळे पुणे नगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होते. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता बंद करण्याचा निर्णय पुणे शहर वाहतुक विभागाने घेतला आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून बॅरिकेट्स लावून हा रस्ता बंद करण्यात आला. या संदर्भात लेखी हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत.

23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2021 पर्यंत येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात त्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार असून त्यानंतर हा रस्ता कायमस्वरूपी बंद करायचा की नाही याबत अंतिम आदेश काढण्यात येईल. यामधून रुग्णवाहिका, अग्निशमन व पोलीस वाहने वगळण्यात आली आहेत.पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे.

आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाणारा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.
हडपसर : नाण्यांपासून बनवले आकर्षक शिवलिंग

व्यापाऱ्यांचा आक्षेप

या निर्णयाला लोहगाव रोड वरील व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला असून बंद रस्त्यामुळे ग्राहक आमच्यापर्यंत पोहचणार नाही. आमचा व्यापार ठप्प होईल. अशी प्रतिक्रिया कपड्याचे व्यापारी रोहित सुराणा तसेच हॉटेल चालक रती बोरा यांनी दिली. याबाबत सर्व व्यापारी आक्षेप नोंदविणार आहेत.

हा रस्ता सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. बंद रस्त्यामुळे वाहतूक कितपत सुरळीत राहते ते पहिले जाईल. नागरिकांच्या हरकती व सूचना आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. - जयवंत पाटील, लोणीकंद वाहतूक विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com