चांदणी चौकातील एनडीए-पाषाण जुन्या पुल पाडण्यापुर्वी वाहतुकीच्या उपाययोजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandani Chauk

चांदणी चौकातील एनडीए पाषाण हा पुल पुढील काही दिवसात पाडला जाणार आहे. हा पुल मंगळवारपासून (ता.13) वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

चांदणी चौकातील एनडीए-पाषाण जुन्या पुल पाडण्यापुर्वी वाहतुकीच्या उपाययोजना

पुणे - चांदणी चौकातील एनडीए पाषाण हा पुल पुढील काही दिवसात पाडला जाणार आहे. हा पुल मंगळवारपासून (ता.13) वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे, त्यामुळे कोथरुड किंवा सातारा रस्त्यावरुन बावधन, पाषाणकडे जाण्यासाठी किमान दिड किलोमीटरचा वळसा घेऊन मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे, तेथून डावीकडे वळून नागरीकांना बावधन, पाषाणकडे जाता येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेने दिली आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुल व रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे चांदणी चौकात मागील काही वर्षांपासून सातत्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत, स्वतः भेट देऊन तत्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, चांदणी चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनडीए पाषाण जुना पुल पाडण्याचा उपाय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविला होता. त्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 15 दिवसात हा पुल पाडण्याचे निश्‍चित झाले होते. त्यादृष्टीने प्रशासनाकडून काम सुरु आहे, मात्र अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. त्यापुर्वी वाहतुकीचा गोंधळ उडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेने प्रायोगिक तत्वावर वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

वारजे, कोथरुडहून पाषाण, बाणेर, बावधन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांनी मंगळवारपासून (ता.13) एनडीए पाषाण पुलाचा वापर करण्याऐवजी भुगाव रस्त्याने सुमारे दिड किलोमीटर अंतर पुढे जाऊन उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या एनसीसी या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयापासून युर्टन घ्यावा, त्यानंतर मुळशीकडून सातारा रस्त्याला उतरणाऱ्या नवीन पुलावरुन साताऱ्याच्या दिशेने महामार्गावर उतरायचे आहे, तेथून पुढे नागरीकांना बावधन, पाषाण, बाणेर, पुणे विद्यापीठ या ठिकाणी जाता येणार आहे, हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे, अशी माहिती बावधान वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले.

Web Title: Traffic Measures Before Demolishing Nda Pashan Old Bridge At Chandni Chowk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..