
खराडी : महापालिकेच्या पथ विभागाकडून मुंढवा नदीपूल ते खराडीदरम्यान केबल टाकण्यासाठी मुख्य रस्त्यावर खोदण्याची परवानगी दिल्याने खराडी हद्दीत पदपथापासून मुख्य रस्त्याकडे सुमारे सात फूट रस्त्यावर खोदईचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जेसीबी लावून लांबपर्यंत रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कोंडीत अडकल्यामुळे पादचारी, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन दिवसा काम थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली.