यमुनोत्री, गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडी; १०- १३ तास भाविक, यात्रेकरू अडकून पडले

उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातून अडकलेल्या भाविक, यात्रेकरूंची संख्या मोठी
traffic on Yamunotri gangotri highway devotees stuck for 10-13 hours police
traffic on Yamunotri gangotri highway devotees stuck for 10-13 hours policeSakal

खडकवासला : हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, गंगोत्री, उत्तरकाशी परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. १०- १३ तास भाविक, यात्रेकरूंना अडकून बसावे लागत आहे.

महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक, पर्यटक या परिसरात आलेले आहेत. वारजे, किरकटवाडी येथील पाच जन व कोथरूड, खराडी परिसरातील २० जणांचा गृप या कोंडीत यमुनोत्री, गंगोत्री मार्गावर अडकला आहे.

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चार धामचे दरवाजे उघडल्याने भाविक, यात्रेकरू मोठ्या संख्येने येतात. उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दर्शन आणि पूजेसाठी येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी झाली. गंगोत्री आणि यमुनोत्री महामार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे.

दरवर्षी चारधाम यात्रा सुरू होताच गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होतो. रविवारी दि.१२ मे रोजी यात्रेचा तिसरा दिवस आहे. गंगोत्री महामार्गावरील सुक्कीच्या सात वळणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चारधाम दर्शनासाठी येणारे भाविक तासनतास वाहतूक कोंडीत अडकले होते. या रस्त्यावर हॉटेल, गावं दुकाने जवळजवळ नाहीत. भक्तांची पायपीट होत आहे.

कोण कुठे अडकले

किरकटवाडी येथील राजेंद्र माताळे प्रकाश हडपळ, वारजे येथील प्रदीप देशमुख अनिल वांजळे सिद्धेश्वर अनारसे हे येथे पाच जण आहेत. यांनी यमुनोत्री, गंगोत्री येथून उत्तरकाशीला येताना वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

श्याम टेकाळे यांच्यासोबत कोथरूड, खराडी परिसरातील २५ जणांचा गृप हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री या कोंडीत अडकले आहे. शनिवार पासून या परिसरात वाहतूक कोंडीला सुरवात झाली आहे.

यमुनोत्री धाम परिसरात देखील वाहतूक कोंडी झाली आहे. घोडे, पालखी, महामार्गावरही वाहनांच्या रांगा, लागल्याचे चित्र आहे. स्थानिक टूरिस्ट गाईड, स्थानिक प्रशासन यांच्यात मतभेद असल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या शेकडो वाहनातून हजारो भाविक पर्यटक अडकलेले आहेत. यमुनोत्री धाम परिसरात देखील वाहतूक कोंडी झाली आहे. घोडे, पालखी, महामार्गावरही वाहनांच्या रांगा, लागल्याचे चित्र आहे.

स्थानिक टूरिस्ट गाईड, स्थानिक प्रशासन यांच्यात मतभेद असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या शेकडो वाहनातून हजारो भाविक पर्यटक अडकलेले आहेत. माताळे व टेकाळे यांनी सांगितले.

यांनी सकाळ शी बोलताना सांगितले, यमुनोत्री करून रविवारी गंगोत्रीला जाताना आम्ही २१ तास चालत होतो. आज सोमवारी सकाळी गंगोत्री वरून उत्तरकाशीला निघालो आहे. बारा तासात आम्ही ४० किलोमीटर अंतर पार केले आहे.

एक किलोमीटर गेल्यावर दोन तीन तास थांबावे लागत आहे. यामुळे सोबत घेतलेले जेवण खाद्यपदार्थ संपत आले आहे. या रस्त्यावर हॉटेल्स दुकाने गावे जवळजवळ नाही. यामुळे आलेल्या भाविक, यात्रेकरूंचे मोठे हाल होत आहेत. लहान मुले महिला असणाऱ्या यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

यमुनोत्री गर्दीमुळे फूटपाथवर अनेक ठिकाणी भाविक अडकले आहेत. त्याचबरोबर चालताना टेकडीवरून दगड पडण्याचा धोका प्रत्येक क्षणी असतो. कधी वातावरण बदलेल. काही आपत्ती, दुर्घटना घडू नये. यामुळे, भाविक पर्यटकांच्या मनात भीती आहे. मानसिक तणाव देखील येत आहे.

- राजेंद्र माताळे, किरकटवाडी

पुण्यातील कोथरूड खराडी भागातील वीस जणांचा ग्रुप देखील या ठिकाणी आलेला आहे. हरिद्वार ते बारकोट हे दीडशे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १९ तास लागले. बारकोटचे यमुनोत्री ते 55 किलोमीटर अंतर 13 तास लागले. आज १० तास गाडीच्या एका जागेवर आहे. पोलिसांच्या नाक्यावर स्पीकर यंत्रणा बंद पडली आहे. पोलिसांनी सकाळी दोन तासात तुम्हाला सोडतो. असे आम्हाला सांगितले आणि तब्बल 13 तासांनी आम्हाला गाडी सोडली. यमुनोत्रीची क्षमता आठ हजार यात्रेकरू येऊन थांबतील अशी आहे. परंतु या ठिकाणी २८ हजार यात्रेकरू अडकलेले आहेत.

-श्याम टेकाळे, कोथरूड

जाणाऱ्या यात्रेकरूंना आवाहन येऊ नका फजिती होईल

महाराष्ट्रातून चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या यात्रीकर्मी भाविकांना कृपया सध्या या ठिकाणी येऊ नका. चारपट यात्रेकरू आल्यामुळे त्यामुळे येथील सर्व यंत्रणा कोलमडली आहे. वृद्ध, मुले. महिला यांचे हाल होत आहेत महामार्ग अरुंद आहे.

एका बाजूला उंच कडा, एका बाजुला खोल दरी आहे. शौचालयास जाण्यासाठी रस्ता जागा देखील नाही. रस्त्यावर दुकाने हॉटेल नाही. मागि व चहा शिवाय दुसरे काही मिळत नाही. येथील शासकीय यंत्रणा सर्व कोसळून पडली आहे तुमची फजिती होऊ शकते. असे आवाहन अडकलेले यात्रेकरू राजेंद्र माताळे व श्याम टेकाळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com