Pune News : मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या सुमारे सव्वाशे जणांवर "थर्टी फर्स्ट'च्या रात्री कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police

Pune News : मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या सुमारे सव्वाशे जणांवर "थर्टी फर्स्ट'च्या रात्री कारवाई

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देताना 31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या सुमारे सव्वाशे वाहन चालकांविरुद्ध वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे गंभीर अपघातांचे प्रमाणांवरही नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकली.

दरवर्षी 31 डिसेंबरला मध्यरात्री मद्यपान करुन भरधाव वाहने चालविण्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. त्यामध्ये अनेकदा नागरीकांचे जीव जाण्याचे, गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडल्या.

अशा गंभीर स्वरुपाचे अपघात रोखणे तसेच मद्यपी वाहचनचालकांच्या विरुद्ध वाहतुक पोलिसांनी शनिवारी 31 डिसेंबरला मध्यरात्री विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच चौकात बंदोबस्त तैनात केला होता.

नववर्षाच्या रात्री मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 121 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी शहरातील 27 ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली.