Wagholi News : वाहतूक पोलिसांची जोरदार कारवाई; एका दिवसात ३०५ वाहनांवर कारवाई, दोन लाख दंड वसूल

वाहतूक पोलिसांनी एका दिवसात वाघोली परिसरात वाहतूक नियमन मोडणाऱ्या ३०५ वाहनधारकांवर कारवाई केली.
Traffic Police Crime
Traffic Police Crimesakal
Updated on

वाघोली - बुधवारी वाहतूक पोलिसांनी एका दिवसात वाघोली परिसरात वाहतूक नियमन मोडणाऱ्या ३०५ वाहनधारकांवर कारवाई केली. त्याबदल्यात सुमारे दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने वाघोली व परिसरात किती बेशिस्त वाहनधारक आहेत. याचा आकडाच समोर आला.

काही दिवसापूर्वी पुणे नगर महामार्गावर केलेल्या अतिक्रमण कारवाई मुळे वाहतूक कोंडीत काहीसा फरक पडला असला तरी बेशिस्त व नियम मोडणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडी होतच आहे. या बेशिस्त वाहतुकीबाबत पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती.

आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन बुधवारी वाघोली वाहतूक विभागाकडे अधिकाऱ्यांसह सुमारे साठ कर्मचारी कारवाई साठी पाठविले. यामुळे प्रत्येक चौकात कारवाई साठी वाहतूक पोलिसांचा ताफाच होता. उलट्या दिशेने वाहतूक करणे.

ट्रिपल सीट वाहतूक, सिग्नल तोडणे, कोठेही वाहन पार्क करणे, फॅन्सी निलंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे. अशा अनेक वाहनांवर कारवाई केली. अनेक वाहने वाघोली वाहतूक विभागात आणण्यात आली. या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. आपले वाहन दंड भरून सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री ११ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

अशा कारवाईने शिस्त लागेल का ?

जादाचे वाहतूक कर्मचारी पाठवून काही दिवस केलेल्या अशा वाहतूक कारवाईने बेशिस्त वाहतूक धारकांना शिस्त लागेल का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. शिस्त लावण्यासाठी सततची कारवाई गरजेची आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्य बळ असणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

वाहन चालकांचा मगरूर पणा

बुधवारी ही जोरदार कारवाई सुरू असताना काही मगरूर दुचाकी व  चारचाकी वाहनधारकानी बिनधास्तपणे उलटी वाहतूक करून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना चिटकून वाहन उभे केले. तर काही वाहनचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अशा वाहनचालकांना प्रसाद तर मिळालाच शिवाय दंड ही वसूल करण्यात आला.

मात्र प्रतिसाद नाही

कारवाई केलेले अनेक वाहनचालक आपले वाहन सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना फोन करत होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे कळते.

आकडेवारी बोलतात

वाघोली वाहतूक विभाग -- वाहतूक पोलिस -- ३५

प्रत्यक्षात गरज --- ५० ते ५५

लोणीकंद वाहतूक विभाग --- वाहतूक पोलिस -- १०

प्रत्यक्षात गरज --- २० ते २५

'पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार जोरदार कारवाई सुरू आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. वाहन चालकांनी नियमात वाहन चालविल्यास कारवाई होणार नाही. तसेच वाहतूक कोंडीलाही आळा बसेल. सातत्याने ही कारवाई सुरू राहील.'

- दत्तात्रय लिगाडे, सहायक पोलिस निरीक्षक, वाघोली वाहतूक विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com