Breaking : पुणे-सोलापूर रस्ता काही काळासाठी बंद; वाहतूक पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

सध्या पावसाचा जोर कायम असल्याने, पुढील काळात रस्त्यावर आणखी पाणी येण्याची शक्यता आहे. 

लोणी-काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवा फुड मॉलसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने, पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट!

जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात दुपारपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचे पाणी, देवा फूड मॉलसमोर रस्त्यावरून वाहू लागले. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने, पुढील काळात रस्त्यावर आणखी पाणी येण्याची शक्यता आहे. भिगवण-इंदापूर मार्गादरम्यान वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. रस्त्यावरील पाणी पातळी पाहून वाहतुकीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी पावसाचा अंदाज घेऊन प्रवास करावा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic on Pune to Solapur highway closed indefinitely