Sinhgad road Flyover
sakal
पुणे - सिंहगड रस्त्यावर मेट्रोचे काम करताना उड्डाण पुलाचे काय होणार? नव्याने उभारलेला उड्डाण पूल पाडणार की बाजूला मेट्रोचे खांब येणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. मात्र, उड्डाण पूल बांधतानाच मेट्रोच्या खांबांची जागा निश्चित केली असून, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ६६ ठिकाणी उड्डाण पुलाला छेद दिला जाणार आहे.