
अविनाश ढगे
पिंपरी : बेशिस्त वाहनचालक, वाहतूक नियोजनाचा अभाव आणि उदासीन प्रशासन यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गडद होत चालली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. चाकण, मोशी, भोसरी परिसरातून कामानिमित्त पुणे शहरात जाणाऱ्या आणि भोसरी, मोशी परिसरातून कामानिमित्त चाकण ‘एमआयडीसी’मध्ये जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.