Balewadi Traffic : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांची कसरत; बालेवाडीतील एसकेपी कॅम्पस परिसरातील स्थिती, वाहतूक कोंडीत भर
Balewadi SKP Campus Traffic : बालेवाडी एसकेपी कॅम्पस परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचून वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
बालेवाडी : येथील एसकेपी कॅम्पसजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.