
अश्विनी पवार
पिंपरी : सध्या हिंजवडीत होणारी वाहतूक कोंडी पाहता येथील कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा मिळावी, ही मागणी ‘आयटीयन्स’ सातत्याने करत आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यांनी पाच दिवस कार्यालयात येणे बंधनकारक केले असून, काही कंपन्यांनी ‘हायब्रीड’चा पर्याय दिला आहे. त्यामुळे ‘आयटीयन्स’ला किमान दोन दिवस तरी कार्यालयात जाणे भाग पडत आहे. त्यामुळे कामाचा ताण, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ अशा तिहेरी संकटात आयटीयन्स अडकले आहेत.