
कात्रज : कात्रज चौकातील भाजी मंडईपासून पुढे सातारा रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी आधी पावसाळी पाण्याची वाहिनी टाकण्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, संथ कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कामाला गती देत दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.