panshet dam
sakal
वेल्हे - पानशेत धरणात मद्याच्या नशेमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.