Dog Attack : चाकणला भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पादचारी महिलेचा मृत्यू

चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आंबेठाण चौकाजवळील भराव मार्गखालील पर्यायी रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
stray dog

stray dog

sakal
Updated on

चाकण - येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात रात्री दोनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळील भराव मार्गखालील पर्यायी रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोभा विजय वाघमारे (वय-३२ वर्ष, मूळ रा .देगलूर, जि.नांदेड) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. अशी माहिती चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com